Posts

Showing posts from April, 2017

वृक्ष काळाची गरज

Image
                          गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.  महाराष्ट्रात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वनलागवडीच क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेकदा वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले गेले, त्यावर मोठ्याप्रमाणात निधी खर्च झाला परंतू वन लागवडीचे क्षेत्र किंवा जंगल क्षेत्र म्हणावे तेवढे वाढू शकले नाही हे खेदाने नमूद करावे लागते.                                 राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २०.३ टक्के क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावर जंगल आहे. बीड जि...