वृक्ष काळाची गरज

                         Image result for वृक्ष काळाची गरज
गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. 
महाराष्ट्रात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वनलागवडीच क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेकदा वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले गेले, त्यावर मोठ्याप्रमाणात निधी खर्च झाला परंतू वन लागवडीचे क्षेत्र किंवा जंगल क्षेत्र म्हणावे तेवढे वाढू शकले नाही हे खेदाने नमूद करावे लागते. 
                              Image result for वृक्ष काळाची गरज
राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २०.३ टक्के क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावर जंगल आहे. बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण २५५३८ हेक्टर जंगल व्याप्त क्षेत्र आहे. हे एकूण भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास फक्त २.३९ टक्के एवढे असून महाराष्ट्रातील जंगल व्याप्त क्षेत्रापेक्षा खूपच कमी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलव्याप्त क्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे आहे. या महत्वाच्या वन संपत्तीचे संरक्षणाअभावी महाराष्ट्रातील वृक्षतोड आणि जंगलावरील अनाधिकृत अतिक्रमण यामुळे राज्यात आवर्षण, तापमान वाढ, क्लायमेट चेंज, पाणी टंचाई, दुष्काळ सासारखे संकट वाढत आहे किंबहूना वाढले आहे. याकडे त्वरीत गांभीर्याने न पाहिल्यास येत्या काही वर्षात महाराष्ट्रात वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. 
वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या वन विभागाने सकारात्मक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. 
                                Image result for वृक्ष काळाची गरज
गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातील डोंगरपट्यावर वृक्षलागवडी झाल्या असत्या आणि त्याच्या संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी आपल्या राज्यकत्र्यांनी घेण्याचे प्रयत्न केले असते तर आजची दुष्काळाची परिस्थिती उद्भवली नसती. परंतू विकास आणि समृध्दतेची दृष्टी नसलेल्यामुळे आहे त्या वनक्षेत्राचा भाग कमी होवू लागला आहे. वाढते औद्योगीक क्षेत्र आणि त्याच्या अतिक्रमणामुळे आजून किती वृक्षतोड होवून वनक्षेत्राला आपल्याला मुकावे लागेल हे सांगता येणार नाही. वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. 
औद्योगीकीकरण व प्रदुषणामुळे आज मानवी समाजापुढे अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत. वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होते आहे त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतू पर्जन्यवृष्टी मात्र त्याप्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचेसाठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ही समस्या आपण समजून घेण्यात का? कमी पडत आहोत हे सरकारने आत्मचिंतन करावे आणि वनसंवर्धन व संरक्षण यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याची काळजी घेण्यात यावी. 
ताडोबा व्याघ्रप्रकल्प, पश्चिमघाट, आणि देशातील इतर वनक्षेत्र यात होणारी घट कमी करुन जंगलाचे क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे हे ओळखून वृक्षारोपन, सामाजिक वनीकरण या योजनांची अंमलबजावनी करून महाराष्ट्रातील डोंगरपट्टा आणि पडीक वनजमीन क्षेत्रावर मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड हाती घेवून तीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षदिंडी, प्रचार मोहिम राबवने आवश्यक आहे तरच वनीकरणाचे, निसर्गाचे संवर्धन आणि रक्षण होईल हीच काळाची गरज आहे हे लक्षात घ्यावे. 
                                   Image result for वृक्ष काळाची गरज
शहर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा फटका तापमान वाढीस करणीभूत ठरत आहे. शासनातर्फे होणारी वृक्षतोडही अनेक समस्यांचे कारण बनत आहे. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही. अनेक भागात रस्ता रुंदीकरण, मोठे प्रकल्प, धरणे बांधणे, बांधकाम, उद्योगधंदे उभारताना होणारी वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात असते. या आधीही वृक्षतोड झाली आहे, होत आहे आणि होत राहणार यात मात्र शंका नाही. मात्र, याचा फटका पर्यावरण तसेच वन्यजीवांनाही सहन करावा लागत आहे. अनेक संघ-संस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी रोपटी लावण्याचा प्रकल्प हाती घेतला. काहींनी केलेली वृक्ष लागवड ही यशस्वीही ठरली. मात्र, खरच हे वृक्ष मोठे झालेत का? याचे संवर्धन होत आहे का याची दखल मात्र कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झालेल्या वृक्ष लागवडीच्या झळा आपल्याला जाणवत असल्या तरी आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. शासनातर्फे मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र, लावलेली झाडे जगतात की मरतात याची काळजी घेण्याकडे शासनाने पाठ फिरविली आहे. शासनाने लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी काळजी घेतली असती तर आता आपल्या परिसरात जंगलमय वातावरण निर्माण झाले असते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे बेळगाव शहरालाही उन्हाची तीव्रता वाळवंटात असण्याचा प्रत्यय करून देते. आतातरी शासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी घेण्यात यावयाची काळजीही शासनाने हाती घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत काही जाणकारांतून व्यक्त होत आहे.
                                  Image result for वृक्ष काळाची गरज
शासनाने वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे रोपटे येते याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे तेथे कडूलिंब, चिंच, बाभूळ यासारख्या झाडांची लागवड केल्यास त्यांचे संवर्धन होऊ शकते. पाणथळ भागात योग्य त्या रोपटय़ांची निवड करून त्यांची लागवड केल्यास या वृक्षांचे संवर्धन होऊ शकते. मात्र, नियोजनबद्धतेच्या अभावी कोठेही आणि कोणत्याही प्रजातीची रोपटी लावली तर ती बाद करण्यातच अधिकतर प्रशासन धन्यता मानत असते. यामुळे अनेक ठिकाणी रोपटय़ांच्या संवर्धनातही दुर्लक्ष होते.
रोप लागवडीवेळी सर्वसाधारणपणे दीड फूट खड्डा खणून त्यामधील दगड काढून शेणखत किंवा कंपोष्ट खत, कुजलेला पालापाचोळा, माती घेऊन रोप लागवड करावी. या बरोबरच वाळवीपासून बचाव होण्यासाठी वाळवी प्रतिबंधक औषधांची मिसळण करावी. चार ते पाच फूट उंच असलेल्या रोपांची निवड केल्यास आणि तीही जून महिन्यात त्याची लागवड केल्यास ते यशस्वी ठरू शकते. मात्र, याकडे शासानाने पाठ फिरविल्याचेच दिसून येते.
शहराच्या सौंदर्यीकरणावर परिणाम
                                    Image result for वृक्ष काळाची गरज
शहराचा विस्तार वाढत आहे तसे वृक्षांची तोडही वाढत चालली आहे. यामुळे शहराच्या निसर्ग सौंदर्यीकरण आणि पर्यावरण तसेच हवामानावर याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. जेथे नवीन वसाहती उभे होत आहेत तेथील वृक्षांची संख्या कमी होत आहे. अशामुळे वृक्ष नष्ट होत असून इमारतींची संख्या मोठय़ा झपाटय़ाने वाढत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान दरवर्षी एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संवर्धन करावे. मात्र, खरंच जर प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष दरवर्षी लावल्यास इमारतींच्या जंगलातही वृक्षांची संख्या वाढल्याखेरीज राहणार नाही. प्रत्येक माणसाला दिवसागणिक दोन झाडांचा तीन किलो ऑक्सीजन दररोज लागतो. यामुळे दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास भावीकाळात मनुष्याला याचा फायदा नक्कीच होणार यात शंका नाही.
पूर्ण वाढ झालेली झाडे रस्ते रुंदीकरण, बांधकाम, उद्योगधंदे, घरे बांधणी तसेच इतर व्यवसाय उभारणीसाठी तोडली जातात. यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी शक्य तितकी रोप लागवड करून नुकसान टाळता येते. मात्र अशा उपक्रमांकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. यामुळे केवळ पर्यावरणाचा ऱहासच होत आहे. आतातरी याचा विचार गांभीर्याने घेण्यासाठी योग्य ती उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
बेळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणी माळरान आहेत. त्या ठिकाणी अनेक वेळा महानगरपालिकेच्यावतीने वृक्ष लागवड केली जाते. ही लागवड दरवर्षी होते. मात्र, अशा माळ रानावर केलेल्या वृक्ष लागवडीचे संवर्धन केल्यास माळरानही जंगलमय बनल्याखेरीज राहणार नाही. यामुळे नेमके प्रशासन कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी निधी वाया करतो याचे भान त्यांना राहिलेले नाही. देशाची साधनसंपत्ती नष्ट होत असताना याला वाचविण्याचे काम हे प्रत्येकाचेच आहे. मात्र, याकडे विशेषतः कोणच लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. 
                               Image result for वृक्ष काळाची गरज
संघ-संस्थांनी लागवड केलेली रोपटीही जाताहेत वाया
विविध संघ-संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मात्र, काही संघ-संस्था केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड करतात. वृक्ष लागवड झाली की आपले काम संपले असे त्यांचे मत असते. खरेतर वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे ठरते. काही संघ-संस्थांनी तर एकाच खड्डय़ामध्ये अनेक वेळा वृक्ष लागवडीचा संकल्प साधला आहे. अशा संस्थांना खरंच वृक्ष संवर्धनाची काळजी नाही का हो? असा प्रश्नही काही पर्यावरणप्रेमींतून विचारण्यात येत आहे. आतातरी या संस्था सुधारतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. झाडे लावा आणि देश वाचवा असा संदेश देशाने दिला आहे. मात्र, याकडे सर्वांनी पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे.
                                  Image result for वृक्ष काळाची गरज

references:
http://www.tarunbharat.com/?p=118367
http://www.beedlive.com/

Comments

  1. खुप चांगलं लिहिलं आहे, नुसतं वृक्षारोपण करून आपलं काम संपत नाही तर दोन ते तीन वर्षे त्याची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच असते त्यानंतर ते झाड स्वतः जगण्यास तयार होत असते. तेव्हा जास्तीत जास्त वृक्षारोपण करा पण ती रोपं जगवासुद्धा....

    ReplyDelete
  2. VERY USE ABLE INFORMATION.THANKS FOR IT.

    ReplyDelete
  3. Pin on Daftar Joker Gaming Casino - Shootercasino
    Pin on Daftar Joker Gaming Casino. The new casino is now available for the 제왕카지노 통장 new members from the most reputable online casinos in the market.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Literature